श्री संत परमहंस परशराम महाराज

विज्ञानाने कितीही प्रगती केली तरी या सृष्टीचे गुढ उकलतांना मानवाचे प्रयत्न व यश एखाघ्या अंथांग सांगरातील काही वाळू कण वेचण्यापेक्षा जास्त नाही. प्रकृती निसर्गाच्या या विविधतेला व सजीव निर्जीव जीव सृष्टीला या अनंत ब्रम्हांडाला जाणणे मानवाच्या बुध्दीसामर्था पलीकडचे आहे. मनुष्याला केवळ चंद्रावर जाता आले चंद्राची निर्मीती करणे शक्य नाही. विज्ञानाला काहीच सूर्यमालेचा शोध लागलाय ब्रम्हांडातील कितीतरी सूर्यमाला अजूनही अज्ञातच आहे. आपण राहतो त्या पृथ्वी सारख्या एका ग्रहावरील पर्वत नद्या घनदाट जंगले वृक्ष वेली मधूर फळे सुंदर फुले प्राणी किटक पशु पक्षी फुलपाखरे निसर्गनिर्मीतच आहे. प्रकृतीच्या अधीन आहे. कुठेतरी या जगाचा निर्मीकच या सर्वातून व्यक्त होतो कधी तो सगुण साकार तर कधी तो निर्गुण निराकार भासतो निर्मीकाच्या अव्यापी अनंत रूपाला अनन्य भावाने शरण जाणे हीच मानवी श्रध्दा…! जी जगण्यासाठी मानवाच्या मनुष्यत्वासाठी आवश्यक आहे. सनातन संस्कृती आणि धर्माची बीजे यातच मिळतात ती कालसुसंगत विविध रूपानी नावांनी विकसीत झालीत कुणी ईश्वर म्हटले कुणी अल्ला कुणी गॉड इतकेच.

जन्माला येणारा प्रत्येक जीवाला जगण्यासाठी श्रध्दा हवीच अगदी नास्तीकाससुध्दा. प्राणी पशु पक्षी अन्न मिळवितांना प्रयत्नरूपी इच्छायुक्त श्रध्दाच ठेवतात. मानवी जीवणाच्या कल्याणासाठी मानसातील मानुसपणासाठी भुतदयेसाठी या पंच महाभुताच्या या सुर्चिभुततेसाठी, निसर्गाच्या नियमनासाठी, सुख समृध्दी शांती ज्ञान आरोग्य समाधान नैतिकता वैज्ञानिक दृष्टीकोन व मानवी प्रगतीसाठी या निर्मीकाच्या सत्तेचे भान ध्यान व अधिष्ठान असावेच लागते. या कृतज्ञतेच्या भावनेतून विचार व आचरणातूनच या जीवनाचे सार्थक होवू शकते.

।। जगाच्या कल्याणा संताच्या विभुती । देह कष्टविती परोपकारे ।।

महाराष्ट्र ही युगपुरुषा सोबतच योगीपुरुषांची संत महात्म्यांची जननी आहे. स्वराज निर्माते युगपुरुष शिवाजी महाराज, भागवत धर्माचा पाया रचणारे माउली ज्ञानदेव, तर त्यावरील कळस संत तुकाराम, समर्थ रामदास, एकनाथ नामदेव ते संत चोखा मेळा कर्मयोगी गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज, योगी संत गजानन महाराज श्री स्वामी समर्थ या संताच्या पदस्पर्श व लीलानी ही भुमी पावन झालेली आहे. “धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, “ लोककल्याण दुख निवारण,सन्मार्ग दर्शक भूतदया मानव कल्याण हेच उदिष्ट, मार्ग पध्दती वेगवेगळया वाटत असल्या चमत्काराचे वलय असले तरी कुणी राष्ट्रनिर्माण यातून जनहीत, अध्यात्म साधले तर कुणी अध्यात्मातून राष्ट्र निर्माण अशा अलौकीक आत्म्याचे या भूमीवरील अवतारकार्य आपण सर्वसामान्य जनासाठी चमत्कारच आहे. विज्ञानासा चमत्कार मान्य नाही पण श्रध्देचे अस्तित्व मानवी ज्ञानकक्षेच्या पलीकडील आहे ज्ञानाने केवळ विषयाचे स्पष्टीकरण व समाधान मिळेल पण डोळस श्रद्धेतून मिळालेला आत्मानुभव, आत्मानंद पारलौकीक आहे.

विहेही श्री संत परमहंस परशराम महाराज यांचा जन्म अमरावती जिल्हयातील वलगांव चांदूर बाजार रोड वरील जळतापूर या छोटयाश्या गावी माता भीमाबाई व पिता बळीराम यांच्या पोटी झाला. ”जन्मताची भास झाला चमत्कार दाखवीला शंकराचा भास झाला मोहे व्यापीले सर्वाला”, हे तेजपुंज या भूमीवर अवतरले तेव्हापासूनच अलौकीक लीला बाळकृष्ण प्रमाणे जनमानसांनी अनुभवल्या अगदी बालपणापासून घोड्याची शेपटी पकडून त्यावर स्वार होणे, तळपत्या उन्हात गुरे चारणाऱ्या गुराखी पाण्यावाचून तहाणेने व्याकुळ झाला असता वांझ असणाऱ्या गाईच्या स्तनातून दुधाच्या धारा प्रकट करून त्याचा जीव वाचविणे कुणी दिलेले भोजन थोडे फार खावून प्रसाद म्हणून दिल्यावर त्यांचे रोग व्याधी दुःख दूर होणे असे अनेक आत्मानुभ लोकांना यायला लागले, महाराज बालपणापासून अंगावर एकही वस्त्र ठेवत नसत, मन्या, मा, बा या व्यतीरिक्त न बोलणाऱ्या या अवलीया वैराग्याची आपल्या विविध लीलामधून लोककल्याणार्थ दिनरात मनमानी भटकंती सुरू राही. महाराजांची किर्ती गावोगाव पसरायला लागली. त्यांच्या जिवन लीलांचे सुमधूर चित्रण महाराजांचे आघ्य चरित्र लेखक आरदनिय रा.ना. पांडे यांच्या श्री परमहंस परशराम महाराज महात्म्य या चरीत्र ग्रंथात तसेच शेख साबू रचित चरीत्रात व २०१४ मध्ये भीमराव लक्ष्मणराव ढोले रचित (दास भिमा ) नावाने श्री परमहंस परशराम महाराज महीमा ग्रंथ रूपाने सहजसुलभ रचनायुक्त रूपामध्ये आपणास पाहावयास मिळते ही सर्व चरीत्र वाचतांना शेगावीचा राणा श्री संत गजानन महाराज यांच्या लीलांचा प्रत्यय क्षणभर मनात आल्यावाचूर राहत नाही. विशेषत महाराजांची गावोगावी भक्तंच्या प्रेमापोटी होणारी भ्रमंती, त्यातील भक्तांच्या कृपाप्रसाद मिळविण्यासाठी व ती कायम स्वरूपी राहण्यासाठी चाललेली खटाटोप त्यातून निर्माण झालेले कधी प्रेममय तर कधी वादविवादाचे प्रंसग असो वा परशराम महाराजांनी निर्जल स्थळी हाताने माती उकरून निर्माण केलेले व आजही अविरत असलेले पिंपळोद येथिल जलकुंड बधीतल्यावर याचा प्रत्यय येतो व श्रधेने दोन्ही कर आपोआप जुळतात आपण नतमस्तक होवून जातो. या साम्यदर्शक लीलाच्या काही क्षणाच्या अनुभुतिमधून तुज गजानन तु परमशरामा ची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. “हम भिन्न हो इस देह से पर तत्व सब एक हो”. या राष्ट्रसंताच्या वचनाची आठवण येते.

जन्माभुमी जळतापूर ते कर्मभूमी श्री क्षेत्र पिंपळोद या प्रवासामध्ये जीथे जीथे महाराज रमले भक्तांना महाराजांचा सहवास कृपा प्रसाद लाभला व आपल्या अलौकीक लीला त्यांनी केल्या ती सर्व स्थळे आज परमहंस परशराम महाराजांची श्रीक्षेत्र म्हणून नावारूपास येत आहे. यामध्ये जन्मभुमी जळतापूर, ता भातकुली, जि. अमरावती कर्मभुमी श्रीक्षेत्र पिंपळोद ता. दर्यापूर, श्री क्षेत्र लाखोंडा, श्रीक्षेत्र इंजा, श्रीक्षेत्र सुकळी गुरव, श्रीक्षेत्र दर्याबाद, श्रीक्षेत्र अंतरगाव शिवाजी चा समावेश आहे. या प्रत्येक ठिकाणी महाराजांची जयंती पुण्यतिथी महोत्सव, दरवर्षी उल्हासाने साजरी होते. जळतापूर येथे जयंती उत्सव तर पिंपळोद येथे दत्त जयंती पर्वावर फार मोठी यात्रा भागवत महाप्रसाद व विविध धार्मिक कार्यक्रम पंचक्रोशीतील जनसमुदाय आनंदाने साजरा करतात. महाराजांवर श्रध्दा असलेला भक्तसमुदाय असा सर्वत्र विखुरलेला आहे. या सर्व भाविकांना एकत्रीतपणे महाराजाच्या माहत्याची व विविध लीला स्थळांची व त्याच्या विषयीच्या विविध अलौकीक विविध घटनांची माहिती एकाच ठिकाणी मिळावी यास्तव या संकेतस्थळाचे प्रयोजनाचा अल्पसा प्रयत्न, अजूनही महाराजांच्या संपूर्ण लीला व ठिकठिकाणी असलेले लीलास्थळे भक्त संप्रदाय एकमेकांना अज्ञात आहे व हळूहळू ज्ञात होत आहे उदा. जन्मस्थळाच्या भक्तांना इ.स. २०१६ पर्यंत परमहंस परशराम महाराजाच्या पावन लीलांनी पवित्र झालेल्या श्रीक्षेत्र लाखोंडा येथे दरवर्षी महाराजांचा मोठया प्रमाणात साजऱ्या होणाऱ्या उत्सवाची काहीही माहीती नव्हती. योगायोगाने लाखोंडा येथिल श्री .याची पोलीस सहा उपनि म्हणून चांदूर बाजार ला बदली झाली तेव्हा त्यामार्गाने जात असतांना त्यांना महाराजांचे जळतापूर येथिल रोडवरील जन्मस्थळाचे मंदिर दिसले व सर्व बाबींचा रहस्यमय रित्या उलगडा झाला. या संकेतस्थळाच्या निमित्ताने अशा सर्व ठिकठिकाणच्या भक्तानी पुढे यावे हे आवाहन आहे.

जय परशराम.

श्री संत परशराम महाराज मंदिर परिसर व इतर दर्शनीय स्थळे

कर्मभूमी श्री क्षेत्र पिंपळोद

विज्ञानाने कितीही प्रगती केली तरी या सृष्टीचे गुढ उकलतांना मानवाचे प्रयत्न व यश एखाघ्या अंथांग सांगरातील काही वाळू कण वेचण्यापेक्षा जास्त नाही. प्रकृती निसर्गाच्या या विविधतेला व सजीव निर्जीव जीव सृष्टीला या अनंत ब्रम्हांडाला जाणणे मानवाच्या बुध्दीसामर्था पलीकडचे आहे....

श्री क्षेत्र इंजा

श्री क्षेत्र लाखोंडा

जन्माभुमी श्री क्षेत्र जळतापूर

विज्ञानाने कितीही प्रगती केली तरी या सृष्टीचे गुढ उकलतांना मानवाचे प्रयत्न व यश एखाघ्या अंथांग सांगरातील काही वाळू कण वेचण्यापेक्षा जास्त नाही. प्रकृती निसर्गाच्या या विविधतेला व सजीव निर्जीव जीव सृष्टीला या अनंत ब्रम्हांडाला जाणणे मानवाच्या बुध्दीसामर्था पलीकडचे आहे....

श्री क्षेत्र सुकळी गुरव

श्री क्षेत्र दर्याबाद

श्री क्षेत्र अंतरगाव शिवाजी